Diwali 2020 : दिवाळीसाठी मिठाई, पेढे घेताना भेसळयुक्त मावा कसा ओळखाल? 'या' ७ ट्रिक्स सोपं करतील तुमचं काम By manali.bagul | Published: November 13, 2020 11:50 AM 2020-11-13T11:50:06+5:30 2020-11-13T12:11:12+5:30
Dhanteras pooja : Best way to quality check of mawa or khoya during dhanteras दिवाळी असो किंवा कोणताही सण गोडाधोडाच्या पदार्थांशिवाय कोणताही सण अपूर्ण असतो. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनानंतर भाऊबीज या सणांना जास्तीत जास्त मिठाई, पेढे, बर्फी मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. अनेकदा बाजारातून असे दुधाचे आणि माव्याचे पदार्थ विकत घेताना फसवणूकीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त मावा आणि योग्य मावा यातील फरक ओळखता यावा यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
१. माव्याच्या तुकड्याला हातावर घेऊन अंगठ्यानी दाबून, चोळून पाहा. जर मावा चोळल्यानंतर तुपाचा वास येत असेल आणि बराचवेळ हा वास बोटांवर असेल तर समजून जा की, हा मावा शुद्ध आहे.
२. माव्याचा एक लहान गोळा तयार करा आणि दोन्ही हातांच्यामध्ये गोल गोल फिरवा. जर फिरवत असताना हा गोळा फुटत असेल तर कदाचित हा मावा भेसळयुक्त असू शकतो.
३. ५ मिली लीटर गरम पाण्यात जवळपास ३ ग्राम खवा घाला. थोडावेळ थंड झाल्यानंतर यात आयोडीन सोल्यूशन घाला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की भेसळयुक्त खव्याचा रंग निळा पडायला सुरूवात होईल.
४. तुम्ही मावा खाऊनही अस्सल मावा आणि भेसळयुक्त माव्यातील फरक ओळखू शकता. मावा खाल्यानंतर तोंडात चिकट चिकट वाटत असेल तर समजून जा की हा मावा खराब आहे. चांगला मावा खाल्यानंतर कच्च्या दुधाप्रमाणे वास येतो.
५. पाण्यात मावा घातल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे झाले तर असा मावा खराब असू शकतो. दोन दिवसांपेक्षा जास्त जुना मावा खरेदी करणे टाळा. हे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
६. तुम्ही कच्च्या माव्याऐवजी भाजलेला, शेकलेला मावा विकत असाल तर बरं होईल. यातून बनवलेल्या गोड पदार्थांची चवही चांगली येते आणि त्वरीत खराब होण्याची शक्यता कमी असते.
७. बनावट माव्यापासून बनवलेल्या मिठाई खाल्ल्याने तुम्हाला अन्न विषबाधा, उलट्या होणे, पोटदुखी येऊ शकते. बनावट माव्यापासून बनवलेल्या वस्तूंमुळे मूत्रपिंड आणि यकृत या अवयवांना धोका असू शकतो.
८. बनावट माव्यामुळे तुमची पाचन क्रिया देखील खराब होते, ज्यामुळे पोटाचे इतर आजार होऊ शकतात.