Do you know the different types of coffee?
कॉफीचे विविध प्रकार तुम्हाला माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:47 PM2019-07-30T19:47:09+5:302019-07-30T20:06:20+5:30Join usJoin usNext कॉफी हे तुमच्यापैकी बहुतेकांचे आवडते पेय असेल. पण या कॉफीचे विविध प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? आज जाणून घेऊया कॉफीच्या विविध प्रकारांविषयी फिल्टर कॉफी दक्षिण भारतातील प्रसिद्ध फिल्टर कॉफीविषयी सर्वांनाच माहिती आहे. खूप पाणी, थोडेसे दूध आणि टाकून चहाप्रमाणे ही कॉफी तयार केली जाते. मात्र पाश्चिमात्य देशात कॉफी दूध टाकून तयार केली जात नाही. एस्प्रेसो कॉफी यामध्ये कॉफी आणि पाण्याशिवाय अन्य कुठलाही पदार्थ मिसळला जात नाही. मात्र ही कॉफी बनवण्यासाठी एस्प्रेसो मशीनची गरज भासते. कॅपुचिनो कॉफी एस्प्रेसो कॉफीमध्ये दूध आणि भरपूर फोम टाकला की कॅपुचिनो कॉफी तयार होते. लाटे कॉफी कॅपुचिनो कॉफीमध्ये थोडेसे दूध मिसळल्यावर लाटे कॉफी तयार होते. इटालियन भाषेत दुधाचा अर्थ लाटे असा होतो. माकियाटो लाटे आणि माकियाटो कॉफीमधील फरक हा केवळ कलेचा आहे. लाटेमध्ये एस्प्रेसोवर दूध टाकून ते चमच्याने ढवळले जाते. तर माकियाटोमध्ये दुधाच्या ग्लासात एस्प्रेसो हळुहळू सोडली जाते. टॅग्स :अन्नfood