दुधापेक्षा अधिक पटीने कॅल्शिअम देणाऱ्या बीया. शरीरातील २०६ हाडं होतील मजबूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 04:23 PM2024-11-21T16:23:14+5:302024-11-21T16:36:42+5:30

Calcium Food : कॅल्शिअम एक असं मिनरल्स आहे जे केवळ आपली हाडंच नाही तर दातांसाठी महत्वाचं असतं.

कॅल्शिअम हाडं मजबूत ठेवण्यासाठी गरजेचं असतं आणि शरीरात याची कमतरता झाली तर शरीर कमजोर होऊ शकतं. अशात कॅल्शिअमसाठी केवळ दुधावर अवलंबून न राहता तुम्ही इतरही काही गोष्टींचं सेवन करू शकता.

कॅल्शिअम एक असं मिनरल्स आहे जे केवळ आपली हाडंच नाही तर दातांसाठी महत्वाचं असतं. तसेच याने मांसपेशी आणि नसांचं कामही चांगलं होतं. अशात आपण जाणून घेऊ की, कॅल्शिअम मिळवण्यासाठी कशाचं सेवन केलं पाहिजे.

आजकाल चिया सीड्सचं सेवन वेगवेगळ्या कारणांनी केलं जातं. चिया सीड्सची खासियत म्हणजे यात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं. तसेच यातून शरीराला ओमेगा ३ फॅटी अॅसिडही मिळतं.

राजगीऱ्यातून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळतं. ज्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. तसेच यात आयर्नही भरपूर असतं. त्यामुळे शरीरात रक्तही कमी होणार नाही.

एक ते दोन चमचे भोपळ्याच्या बियांमध्ये जवळपास दुधाच्या बरोबरीत कॅल्शिअम असतं, या बीया रात्री भिजवून ठेवून सकाळी खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता.

शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये दुधापेक्षा चार पटीने कॅल्शिअम असतं. तसेच यात दुधापेक्षा दहा पट जास्त प्रोटीनही असतं.

जर तुम्ही दूध पित नसाल तर ८ पटीने जास्त कॅल्शिअम मिळवण्यासाठी पांढऱ्या तिळाचं सेवन करू शकता.