Drink clove tea every day in the winter stay healthy
हिवाळ्यात रोज सेवन करा लवंगाचा चहा, होतील 'हे' फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:12 PM2019-01-09T15:12:40+5:302019-01-09T16:24:30+5:30Join usJoin usNext लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत. लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करण्याचं महत्त्व आणखीन वाढतं. लवंगमध्ये फॉस्फोरस, पोटॅशिअम, प्रोटीन, आयर्न, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. इतकेच नाही तर यात व्हिटॅमिन ए आणि सी सुद्धा असतं. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अशात हिवाळ्यात लवंगाचा चहा सेवन केल्यास फायदा होतो. पचनक्रियेसंबंधी समस्या - लवंगाचा चहा पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. लवंगीचा चहा पचनक्रिया चांगली करतो आणि अॅसिडिटी कमी करतो. जेवण करण्याआधी लवंगाचा चहा सेवन केल्यास लाळ अधिक प्रमाणात तयार होते आणि याने अन्न पचन होण्यास मदत होते. दातांचं दुखणं - ज्या लोकांना दातांमध्ये वेदना होण्याची समस्या असते, त्यांना हा चहा आवर्जून घ्यावा. यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. लवंगाचं तेल दातांच्या वेदना दूर करण्यासाठी फार फायदेशीर आहे. लवंगाचा तेल लावल्याने वेदना लगेच दूर होतात. तसेच दातांमध्ये वेदना होत असताना तोंडात एक लवंग ठेवली आणि काही वेळाने बारीक करुन खाल्ल्यास वेदना कमी होतील. कसा कराल चहा - लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो. (Image Credit : Livestrong.com) अर्थरायटिस - जर तुम्ही अर्थरायटिसच्या वेदनांनी हैराण झाले अशाल तर लवंगाचा चहा तुम्हाला आराम देऊ शकतो. यात असलेल्या एनाल्जेरसिक तत्वांमुळे सांधेदुखी, मांसपेशीमध्ये वेदना आणि सूज कमी केली जाते. तसेच लवंगाच्या चहाने प्रभावित जागेवर शेकल्यासही फायदा होतो. डोकेदुखी - डोकेदुखी होत असेल तर लवंग बारीक करुन लगेच कपाळावर लावल्यास फायदा होतो. लवंगाचं तेलही डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचे काही थेंब मिश्रित केल्यास लगेच आराम मिळेल.टॅग्स :घरगुती उपायफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सAyurvedic Home RemediesFitness TipsHealth Tips