कारलं कडू लागतं? मग आजच बदला त्याची भाजी बनवण्याची पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:33 PM2024-07-16T15:33:43+5:302024-07-16T16:02:36+5:30

Bitter Gourd Recipe: योग्य पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर टेस्टीही लागेल आणि कडूही लागणार नाही. अशात आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

Bitter Gourd Recipe: कारल्याचं नाव जरी काढलं तरी अनेक लोकांचं तोंड कडू होतं. बरेच लोक कारलं कडू लागतं म्हणून त्याची भाजी खात नाहीत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कारल्याचा कडवडपणा वेगवेगळ्या पद्धतीने दूर करता येतो. योग्य पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर टेस्टीही लागेल आणि कडूही लागणार नाही. अशात आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

कारलं भाजी बनवण्याआधी सोलून घ्या. याने कारल्याचं कडवटपणा बराच कमी होतो. जर तुम्हाला कारल्याची साल काढायची नसेल तर त्यावर मीठ लावून काही वेळ उन्हात ठेवा. जेव्हा कारल्याला हलकं पाणी सुटेल तेव्हा त्याची भाजी बनवा.

कारल्याच्या बीया कडू लागतात. अशात भाजी बनवताना या बीया काढून टाका. खासकरून जेव्हा तुम्ही कारल्याचा ज्यूस बनवताना तेव्हा बीया काढून टाका. तसेच ज्यूस बनवताना तुम्ही यात एलोवेरा ज्यूसही मिक्स करून शकता.

दह्याचं वापर करून तुम्ही कारल्याचा कडवटपणा दूर करू शकता. भाजी बनवण्याच्या एक तास आधी कारले कापून घ्या आणि ते दह्या मिक्स करून काही वेळ ठेवा. कारल्यातील कडवटपणा दही शोषूण घेईल. त्यानंतर याची भाजी बनवा.

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी मिठाची सगळ्यात जास्त मदत होते. मिठातील मिनरल्स कारल्याचा कडूपणा दूर करतात. भाजी बनवण्याच्या अर्धा तास आधी कारले कापून घ्या आणि त्यांना मीठ लावून ठेवा. जेव्हा कारल्याला पाणी सुटेल तेव्हा ते धुवून त्यांची भाजी बनवा.

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही भाजीत कांदा आणि बडीशेपही वापरू शकता. याने भाजीची टेस्टही वाढेल आणि सोबतच कारल्याचा कडवटपणा कमी होईल.

जर तुम्हाला कारल्याचा कडवटपणा दूर करायचा असेलतर कारले कापून ते तेलात भाजून घ्या. त्यानंतर त्यांची भाजी बनवा याने कारले कडू लागणार नाहीत.