खाण्याचे शौकिन आहात? मग 'या' शहरांना नक्की द्या भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:57 PM2020-01-20T15:57:22+5:302020-01-20T16:02:14+5:30

जगभरातील अनेक लोक हे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भारतात येत असतात. खाद्यपदार्थांसाठी भारतातील अनेक शहरं प्रसिद्ध आहेत. खाण्याचे शौकिन असाल तर या शहरांना नक्की भेट द्या.

खाद्यपदार्थांसाठी अमृतसर लोकप्रिय आहे. लस्सी, फालूदासोबतच फ्रूट क्रीम नक्की खा. तसेच तेथील चिकन टिक्का, फिश फ्रायही प्रसिद्ध आहे.

चेन्नईमध्ये गेल्यावर जिगर थंडा, फिल्टर कॉफी, मुर्कु, सुंदल, नेथिली फिश फ्राय, मैसूर पाक, डोसा, बिर्यानी आणि पनियारम खायला विसरू नका.

इंदूरमधील खाद्यपदार्थ प्रचलित आहेत. रामबाबू पराठे, मालपोहा, दाल बाटी, दही वडा, मूग भजी आणि साबुदाणा खिचडी प्रसिद्ध आहे.

खाण्याचे शौकिन असलेल्या लोकांसाठी लखनऊ हे परफेक्ट ठिकाण आहे. येथील कबाब प्रसिद्ध आहेत पण त्यासोबतच कटोरी चाट, काजू करी, लखनवी पुलाव लोकप्रिय आहे.

अहमदाबादमध्ये गेल्यावर खांडवी, ढोकला, घेवर, थेपला, जशूबेनकुरकुरे प‍िझ्झा, खमन आणि मस्‍का बन नक्की ट्राय करा.

पाटणाचा लिट्टी चोखा जगप्रसिद्ध आहे. यासोबतच स्वादिष्ट खाद्यापदार्थांसाठी पाटणा लोकप्रिय आहे.

टॅग्स :अन्नfood