feed children according to rainbow method they will get more nutrition
मुलांना तंदुरुस्त ठेवायचंय?; रेनबो डाएट ठरेल फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:21 PM2019-09-07T15:21:57+5:302019-09-07T15:27:37+5:30Join usJoin usNext लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. सर्व पोषक घटकांचा त्याच्या आहारात समावेश असावा. रेनबो कलर फूड्स म्हणजेच रेनबो डाएट सध्या लोकप्रिय झालं आहे. यामध्ये रंगाप्रमाणे पोषक घटक असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश असतो. यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्यरित्या होण्यास मदत होते. पांढरा दूध, पनीर, लसूण, तांदूळ, अंड, काजू यासारख्या अनेक पदार्थांचा आहारात समावेश करा. यामध्ये पोषक घटक असल्याने मुलांना त्याचा फायदा होतो. लाल लाल रंगाची फळं आणि भाज्यांमध्ये लायकोपीन, फायटोकेमिकल्स, अँटी इन्फामेटरी गुण असतात. हे घटक मुलांचं इन्फेक्शनल आजारापासून रक्षण करतात. टोमॅटो, लाल मिरची, स्टॉबेरी, सफरचंदाचा आहारात समावेश करा. नारंगी नारंगी रंगाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. तसेत अँटीऑक्सिडेंट, बीटा कॅराटीन लायकोपीन, पोटॅशियमसारखी पोषक तत्त्व असतात. संत्र, गाजर, पपई यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा. हिरवा हिरव्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये व्हिटॅमिन, पोटॅशियम, अँटीऑक्सिडेंट, आयरन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. पिवळा आंबा, पपई, अननस, मका नक्की खा. यामुळे शरिराला ऊर्जा मिळते. निळा आणि जांभळा जांभळ्या रंगाच्या फळांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात. तसेच यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ब्लूबेरी, जांभूळ खा. टॅग्स :पालकत्वअन्नParenting Tipsfood