घरी आहात? चपाती-भाजीसोबतच ‘हे’ सोपे पदार्थ नक्की करा ट्राय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 16:49 IST2020-03-27T16:23:28+5:302020-03-27T16:49:39+5:30
देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा त्यासोबत नवनवीन पदार्थ ट्राय करा.

कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र रोज चपाती भाजी खाण्यापेक्षा त्यासोबत नवनवीन पदार्थ ट्राय करा
चविष्ट पदार्थ घरच्या घरी तयार करून जेवणाची गंमत वाढवता येते. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया.
दही भात
रोज वरण भात खाण्यापेक्षा कधीतरी दहीभातही खा. दही भात आरोग्यासाठी चांगला असतो.
मूगाची उसळ
मूगाची उसळ तयार करणं अत्यंत सोपं असून ती शरीरासाठी पौष्टिक असते.
घावणे
झटपट होणारे घावणे लहान मुलांनाही खूप आवडतात.
बूंदी रायता
बूंदी रायता चविष्ट असून यामुळे जेवणाची गंमत वाढते.
फोडणीचा भात
रोज साधा भात करण्यापेक्षा कधी तरी फोडणीचा भात नक्की ट्राय करा.
कढी
कढी म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
खिचडी
खिचडी हा पटकन होणारा स्वादिष्ट पदार्थ आहे.
लसणाची चटणी
जेवणासोबत लसणाची चटणी असली की जेवणाची चव जास्त वाढते.