Health benefits of ginger sounth powder benefits
फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 05:41 PM2020-02-29T17:41:05+5:302020-02-29T18:03:23+5:30Join usJoin usNext नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही. आल्याचा चहा शरीरासाठी जितकं गुणकारी असतो. तितकचं आल्याची पावडर सुद्धा शरीरासाठी चांगली असते. सुकलेल्या आल्यात आणि सुंठात एंटी बॅक्टीरियल गुण असतात. सर्दी- खोकला आणि ताप अशा अनेक लहान मोठ्या समस्यांपासून आराम मिळवता येतो. सुंठाचे दुध तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दुध गरम करा. मग त्यात १ चमचा सुंठाची पावडर घाला. मग दूध उकळून घ्या. नंतर ते गाळून घ्या. सुंठाच्या दुधाचं सेवन रात्री करणं चांगलं आहे. सुंठाच्या दुधाचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर सुंढाच्या दुधाने उर्जा मिळवू शकता. ऋतु बदलल्यानंतर गळा खवखवणं ही समस्या खूपचं कॉमन दिसून येते. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर सुंठाच्या दुधाच्या सेवनाने फरक दिसून येईल. बदलत्या वातावरणात जीवनशैलीतील बदलांमुळे ताप येणं, थकवा जाणवणं, अंगदुखीची समस्या सतत उद्भवत असते. जर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी सुंठाच्या दुधाचे सेवन केलं तर फरक दिसून येईल. सांधेदुखीचा त्रास होत असेल तर सुंठ खूप फायदेशीर ठरत असतं. रात्री झोपण्याआधी तुम्ही जर सुंठ घातलेल्या दुधाचं सेवन केलं तर सांधेदुखीपासून आराम मिळेल. जर तुम्ही सुंढ आणि गरम पाण्यात मध घालून प्याल तर शरीर चांगलं राहिलं. सुंठाचं दुध पचनक्रिया चांगली राहण्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे पोट दुखणं थांबण्यापासून, एसिडिटी आणि आंबट ढेकर येणं थांबण्यापर्यंत या समस्यांसाठी सुंठाच्या दुधाचं सेवन फायदेशीर ठरत असतं. अनेकांना उचकी लागण्याची समस्या जाणवत असते. कितीही प्रयत्न केला तरी म्हणजचे जास्तीत जास्त पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबण्याचं नाव घेत नाही. अशावेळी तुम्ही सुंठाच्या दुधाचं सेवन करून स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ताप येण्याची आणि थकवा येण्याची समस्या वारंवार जाणवत नाही.टॅग्स :हेल्थ टिप्सअन्नHealth Tipsfood