healthy diet tips foods you should never store in fridge and do not use again
एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर 'हे' पदार्थ पुन्हा ठेवणं पडू शकतं महागात By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 04:00 PM2019-11-09T16:00:31+5:302019-11-09T16:07:53+5:30Join usJoin usNext अन्नपदार्थ दिर्घकाळ टिकून राहावे यासाठी ते प्रामुख्याने फ्रिजमध्ये ठेवले जातात. मात्र काही पदार्थ हे एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा ठेवणं महागात पडू शकतं. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया. मध मध एका बंद डब्यात नीट ठेवल्यास ते दोन वर्षे टिकते. मात्र ते फ्रिजमध्ये ठेवलं तर घट्ट होतं. तसेच त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात. ब्रेड ब्रेड खराब होऊ नये म्हणून तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याची चव बदलते. दूध दूध फ्रिजमध्ये ठेवलं जातं. दुधामध्ये बॅक्टेरिया खूप लवकर तयार होतात. त्यामुळे दूध फ्रिजमधून बाहेर काढल्यावर दोन तासांच्या आत ठेवा. नॉनवेज नॉनवेज अनेकदा फ्रिजमध्ये ठेवलं जातं आणि दोन दिवस ते खाल्लं जातं. मात्र असं करू नये कारण ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. मेयोनीज मेयोनीजमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये तेल आणि शुगर पावडर असते. मेयोनीज फ्रिजमधून बाहेर काढल्यावर पुन्हा आठ तासांच्या आत फ्रिजमध्ये परत ठेवलं नाहीत तर त्याचा वापर करू नका. टॅग्स :अन्नfood