Here are the different types of cakes made in Germany
हे आहेत जर्मनीमध्ये तयार होणारे विविध प्रकारचे केक, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 07:47 PM2020-01-01T19:47:52+5:302020-01-01T20:03:49+5:30Join usJoin usNext जर्मनी हा देश तेथील ब्रेड आणि केकसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही केकचे शौकिन असाल तर येथे तुमच्यासाठी विविध प्रकारचे केक उपलब्ध होऊ शकता. आज पाहूयात जर्मनीमधील विविध प्रकारचे केक.ब्लॅक फॉरेस्ट केक हा केक जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट या ठिकाणची विशेष ओळख आहे. हा केक भारतातही मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. केजेकूखन केजेकुखन म्हणजे चिजपासून बनवलेला केक. हा केक जर्मनीमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. मोनकुखन हा केक बनवण्यासाठी खसखसचा वापर केला जातो. जर्मनीमधील लोक का केक संध्याकाळच्या कॉफीसोबत खाणे पसंद करतात. मारमोरकुखन इंग्रजीत याला मार्बल केक म्हणतात. या केकवर चॉकलेटचा पातळ थल लावलेला असतो. आप्फेलकुखन हा केक बेकरीपेक्षा कॅफेमध्येच अधिक प्रमाणावर खाल्ला जातो. सिम्टश्नेके हासुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण केक आहे. श्ट्रोएसेलकूखन श्ट्रोएसेलकूखन हा जर्मनीमधील अत्यंत साधा केक आहे. हा केक खाताना सोबत दूध किंवा कॉफीची गरज पडते. बीनेनश्टिष बीनेनश्टिष हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण केक आहे. टॅग्स :अन्नजर्मनीfoodGermany