here you will get 100 diffrent types of popcorn in mumbai
मुंबईत इथे मिळतात १०० विविध प्रकारचे पॅापकॅार्न By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 01:15 PM2018-02-17T13:15:04+5:302018-02-17T13:38:55+5:30Join usJoin usNext पॅापकॅार्न खाणं कोणाला आवडत नाही. एखादा चित्रपट बघताना असो व किंवा पुस्तक वाचताना असो पॅापकॅार्न सर्वांनाच आवडतात. आपल्याला फक्त कॅरेमल व चीज असे दोनच प्रकार माहित आहेत. पण जर आम्ही तुम्हाला पॅापकॅार्नचे १०० प्रकार दिलेत तर? होय. दक्षिण मुंबईतील नळ बाजार येथे शाम फास्ट फूड सेंटरमध्ये अक्षरश: १०० वेगवेगळ्या प्रकारचे पॅापकॅार्न बनतात. त्यापैकी काही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १) पाणी पुरी पॅापकॅार्न - पॅापकॅार्नमध्ये पाणीपुरीची चव ही वेगळीच लागते. मधूनच गोड व आंबट लागणारे हे पॅापकॅार्न चवीला सुद्दा खूप चांगले लागतात. पॅापकॅार्नमध्ये पाणीपुरी हा फ्लेवर भारतात फक्त त्यांच्याकडेच मिळतो. तसंच परदेशी नागरिकांची हे पॅापकॅार्न घेण्यासाठी खूप गर्दी असते. २) क्रिम अॅन्ड ओनिअन पॅापकॅार्न - वेफर्समधून आपण नेहमीच क्रिम आणि ओनिअन फ्लेवर खात असतो. पण पॅापकॅार्नमधून तुम्ही हा फ्लेवर खाल्लात तर ह्याची चव ही जिभेवर रेंगाळत राहते. तसंच ह्या पॅापकॅार्नला येणाऱ्या सुगंधामुळे ते संपूच नये असे वाटतात. ३) पुदीना पॅापकॅार्न - चवीला थोडे वेगळे व रंगाने हिरवे असे हे पॅापकॅार्न असतात. पुदीन्यामुळे ह्या पॅापकॅार्नचा रंग हिरवा होतो तसंच पुदीन्याचा थंडावा जाणवावा यासाठी हे पॅापकॅार्न विविध प्रकिया करून बनवले जातात. म्हणून खाताना ह्या पॅापकॅार्नमध्ये थंडावा जाणवतो. ४) चॅाकलेट पॅापकॅार्न - लहान मुलांच्या आवडीचं ते म्हणजे चॅाकलेट. त्यामुळे लहान मुलांसाठी इथे चॅाकलेटमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे पॅापकॅार्न मिळतात. चॅाकलेट पॅापकॅार्न खाल्यावर लगेच तोंडात विरघळतात व त्यातून चॅाकलेट व पॅापकॅार्न एकाचवेळी खाल्याचं समाधानही मिळतं. ५) बारबिक्यू पॅापकॅार्न - ह्या पॅापकॅार्नला बनवताना भट्टी दिली जाते व त्यात मसाले टाकून दोन वेगवेगळ्या पॅापकॅार्नचं मिश्रण करून पॅापकॅार्न दिले जातात. रंगाने काळे पण कुरकुरीत असे हे बारबिक्यू पॅापकॅार्न चवीला गोड व तिखट असतात. टॅग्स :मुंबईअन्नMumbaifood