तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 01:41 PM 2024-09-22T13:41:52+5:30 2024-09-22T13:47:16+5:30
How To Check Desi Ghee Purity: सध्या तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात असलेले लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तुपामध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. सध्या तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात असलेले लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तुपामध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे.
तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं तूप भेसळयुक्त होतं. तसेच त्यामध्ये सोयाबीन, सूर्यफूल, नारळ आदींबरोबरच फिश ऑईल आणि प्राण्यांच्या चरबीसारखे पदार्थ होते. तज्ज्ञ हे देशी तूप हे आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगतात. मात्र त्यामधील भेसळ ही मात्र आरोग्याला हानिकारक ठरू शकते. दरम्यान, तुमच्या घरी वापरण्यात येणारं तूप हे शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तपासून घेऊ शकता. त्यासाठीचे काही सोप्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
त्यामधील पहिली पद्धत म्हणजे वॉटर टेस्ट. एका ग्लासामध्ये साधं पाणी घेऊन त्यात चमचाभर तूप टाकावं. जर तूप शुद्ध असेल तर ते पाण्यावर तरंगत राहील. तर त्यात भेसळ असल्यास ते पाण्यात बुडेल.
शुद्ध तूप ओळखण्याची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मेल्टिंग टेस्ट. थोडंसं घट्ट तूप तव्यावर घेऊन गरम करावं. तूप शुद्ध असल्यास त्वरित विरघळेल आणि त्याचा रंग काहीसा तपकिरी होईल. तसेच तूप भेसळयुक्त असेल तर ते विरघळण्यास वेळ लागेल. तसेच ते पिवळ्या रंगाचं दिसेल.
शुद्ध तूप ओळखण्यासाठीची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे आयोडिन टेस्ट. तुमच्या घऱात आयोडिन असेल तर एक चमचाभर तूप घेऊन त्यावर आयोडिन मिसळावं. जर तूपाचा रंग बदलून ते जांभळ्या रंगाचं झालं, तर त्यामध्ये काहीतरी भेसळ असू शकते.
शुद्ध तूप ओळखण्यासाठीची आणखी एक पद्धत म्हणजे शुगर टेस्ट. त्यासाठी चमचाभर तूप आणि चमचाभर साखर घ्यावी आणि दोन्ही एकत्र गरम करावेत. जर साखर लगेच विरघळली नाही आणि तिचा गोळा तयार होऊ लागला तर तुपामध्ये भेसळ आहे, असं समजून जावं.
याशिवाय गाईचं तूप हातावर घेतल्यास लगेच विरघळू लागतं. जर ते हातावर घेतल्यानंतरही विरघळलं नाही तर त्यात भेसळ आहे हे समजून जावं. शुद्ध तुपाची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ते सामान्य तापमानात द्रवरुपात राहतं.