impressive benefits of corn
पावसाळ्यात मका खाता? मग मक्क्याचे 'हे' फायदे नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 04:27 PM2018-07-18T16:27:51+5:302018-07-18T16:38:29+5:30Join usJoin usNext पावसातील धुंद वातावरणात वाफाळलेला चहा, गरमागरम भज्जी असा बेत हा हमखास आखला जातो. पण या पावसात अजून एक अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ अर्थात 'भुट्टा' म्हणजेच 'मका'. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या मक्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया. मका हृदयासाठी उपयुक्त आहे. मक्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. मका खाल्ल्याने अपचन किंवा अॅसिडीटीची तक्रार राहत नाही. मक्यातील जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. मका आपण कच्चा खाऊ शकतो तसेच शिजवून खाल्ला तर तो अधिक पौष्टिक बनतो. मक्यातील अ जीवनसत्व डोळ्यांसाठी फायदेशीर असते. मक्यातील फाईटोकेमिकल्स आपल्याला अनेक आजारापासून वाचवतात. शरीरात रक्ताची कमी असल्यास मका खावा.टॅग्स :अन्नआरोग्यfoodHealth