वजन कमी करण्यासह पोट साफ होण्यासाठी सकाळच्या नाष्त्यात खा पौष्टीक अप्पे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:38 PM2020-01-31T17:38:25+5:302020-01-31T17:50:34+5:30

अप्पे हा पदार्थ दक्षिण भारतात सर्वाधिक खाल्ला जातो. पण तयार करण्यास सोपा असल्यामुळे भारतात सगळ्यात ठिकाणी अनेक घरात नाष्त्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो. पण या पदार्थांचे फायदे अनेक आहेत रोजच्या नाष्त्यामध्ये जर तुम्ही या पदार्थाचा समावेश केला तर तुम्ही फिट राहू शकता. काही ठिकाणी या पदार्थाला अप्पम सुद्धा म्हटलं जातं.

संपूर्ण शरीराला उर्जा देण्यासाठी सकाळी अप्प्याचं सेवन लाभदायक ठरत असतं. यात व्हिटामीन बी १२ असतं. जे शरीराची पचनक्रिया व्यवस्थीत ठेवण्यासाठी उपयोगी असतात. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.

हा पदार्थ तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाष्त्यासाठी काही वेळात हा पदार्थ तयार करू शकता. यात फक्त १२० कॅलरीज असतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त ठरत असतो.

यात एंडिऑक्सीडेंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. तुम्ही डाएट फुडमध्ये सुद्धा अप्प्यांचा समावेश करू शकता.

गॅस, अपचन यांसारखे पोटाचे विकार होत नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतड्यांच्या आजारापासून दूर राहता येतं. अप्प्यांचा आहारात समावेश केल्यास सतत भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. यात अनेक पोषक तत्व असतात.

शरीरात कॉलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी हा पदार्थ फायदेशीर ठरतं असतो. यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. फास्ट फुडचा समावेश नाष्त्यात करण्यापेक्षा अप्पे हा पदार्थ खाल्ल्यास अनेक बदल जाणवतील.

टॅग्स :अन्नfood