lifestyle eat oranges in this winter for health benefits
थंडीत संत्री खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कसं By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 02:46 PM2020-01-11T14:46:52+5:302020-01-11T14:56:23+5:30Join usJoin usNext थंडीच्या दिवसांत संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, कोलिन, कॅल्शिअम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी - 1 भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये कमी कॅलरी आणि हाय फायबर रिच असल्याकारणाने वेट लॉससाठी फायदेशीर ठरतं. तसेच अनेक गुण असल्याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये असलेल्या फॉलिक अॅसिड किंवा फॉलेट व व्हिटॅमिन बी मेंदूच्या विकासाठी चांगलं असतं. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए चं सुद्धा प्रमाण भरपूर असतं त्यामुळे त्वचा हेल्दी राहते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ने भरपूर असलेल्याने याचा सौंदर्य खुलवण्यासाठी फायदा होतो. अँटी एजिंग गुणांसोबतच यात डाग दूर करण्याचे गुणही आढळतात. पोषक तत्व असल्याने प्रेग्नेंट महिलांनी संत्री खावीत. याने गर्भात असलेल्या बाळाचा विकास चांगला असतो. सोबतच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा धोकाही वाढतो. संत्री डोळ्याच्या म्यूकस मेम्ब्रेन्सला हेल्दी करतात. याने मेक्यूलर डिजनरेशनपासून डोळ्यांचा बचाव होतो. मेक्यूलर डिजनरेशन डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित एक समस्या आहे. संत्र्याचा ज्यूस देखील शरीरासाठी उत्तम असतो. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. टॅग्स :अन्नफळेfoodfruits