reasons you must eat pumpkins or kaddu or bhopla regularly
थंडीत आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करणं ठरतं फायदेशीर; जाणून घ्या फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 10:41 AM2018-10-28T10:41:21+5:302018-10-28T10:49:05+5:30Join usJoin usNext हिवाळा सुरू झाला की, शरीराला ऊब मिळेल अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्यात येतो. त्याचप्रमाणे खोकला, सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या समस्याही उद्भवतात. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी भोपळा फायदेशीर ठरतो. हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भोपळा अगदी सहज मिळतो. यामध्ये व्हिटॅमिन-ए, कॅरोटीन, जँथिन आणि जॅक्सॅथिन यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. अनेक आहार तज्ज्ञदेखील आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. भोपळ्यामध्ये फोलेट अॅसिड मोठ्या प्रमाणावर असतं. जे आयर्न एसिमिलेशन आणि हिमोग्लोबिनचा स्तर व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचसोबत हे चेहऱ्यावरील पिम्पल्स आणि केसांत झालेला कोंडा दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. भोपळा अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन बी आणि बी6 सूज कमी करण्यासाठी आणि पीएमएसमध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी मदत करतात. भोपळ्याची भाजी किंवा सांबर तयार करून तुम्ही आहारामध्ये याचा समावेश करू शकता.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth