Salad is the high water content food type
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड! By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:06 PM2019-01-16T18:06:08+5:302019-01-16T18:11:51+5:30Join usJoin usNext अनेकदा शरीरामधील पाण्याच्या कमतरतेमुळे आपलं शरीर डिहायड्रेट होतं. शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य प्रमाणात नसेल तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक लोकं फार कमी पाणी पितात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु एका तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, आपण आपल्या आहारातही पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरामधील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला सलाड मदत करतं. सलाडमध्ये वापरण्यात येणारे पदार्थांमध्ये मुळातच पाण्याचा स्त्रोत असतो. उदा. काकडी, टॉमेटो यांसारख्या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात असतं. नियमितपणे सलाड खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. याव्यतिरिक्त सलाडमध्ये प्रोटीनदेखील असतं. सलाडमध्ये प्रामुख्याने वापरली जाणाऱ्या ब्रोकलीमध्ये 89 टक्के पाण्याचे प्रमाण असते. यामुळे शरीरामधील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. ज्यांना डिहाड्रेशनच्या समस्येचा सतत सामना करावा लागत असेल. त्यांनी दिवसातून एक तरी सफरचंद खाणं आवश्यक असतं. कारण यामध्ये 89 टक्के पाणी असतं. तसेच फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व असतात शिजलेल्या तांदळामध्येही पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आहारात भाताचा समावेश केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते.टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सHealthy Diet PlanHealth TipsHealthFitness Tips