फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका 'हे' 5 पदार्थ; अन्यथा पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:47 PM2018-10-02T15:47:55+5:302018-10-02T15:52:03+5:30

प्रत्येक घरात फ्रिज आल्यापासून जीवन अगदी सुकर झालं आहे. पाणी थंड करण्यासाठी, भाज्या, फळं ठेवण्यासाठी फ्रिजचा उपोग करण्यात येतो. परंतु प्रत्येक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं शक्य नसतं. तसेच काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होण्याची शक्यता अधिक असते. जाणून घेऊयात अशा पदार्थांबाबत...

बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नये, थंड तापमानामध्ये बटाटे ठेवल्याने स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यामुळे बटाटे फ्रिजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवणं चांगलं असतं.

कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणून कांदा दिर्घकाळ टिकवण्यासाठी कोरड्या आणि अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवणं गरजेचं असतं.

ब्रेड खराब होईल या भितीने तो फ्रिजमध्ये ठेवण्यात येतो. त्यानंतर बरेच दिवस तोच ब्रेड खाण्यात येतो. परंतु फ्रिजमध्ये ठेवलेला ब्रेड लगेचच सुकून जातो.

मध व्यवस्थित डब्ब्यामध्ये ठेवलं तर त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. मध फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये गुठळ्या तयार होतात.

लोणचं फ्रिजमध्ये ठेवल्याने दुसरे पदार्थही खराब होऊ शकतात. लोणच्यामध्ये व्हिनेगर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवणं घातक असतं.