Very important test tasty, these 6 wild monsoon vegetables
व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी, या 6 रानभाज्यांचा आस्वाद घ्याच By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:16 PM2019-07-04T21:16:39+5:302019-07-04T21:21:38+5:30Join usJoin usNext पावसाळ्यात जंगलात जागोजागी रानभाज्या उगवल्याचं चित्र असतं. मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळेसह कोकणातल्या अनेक ठिकाणी या रानभाज्या आढळतात. कुलुची भाजी- पावसाळ्याच्या पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात अनेक ठिकाणी उगवते. त्यामुळे या दिवसांतून या भाजीची चव नक्कीच चाखायला मिळते. करटोली- करटोली एक प्रकारची फळभाजी असून, ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते अन् कडूसुद्धा लागते. कारल्याची भाजीसारखीच करटोलीची भाजी करतात. कुरडू- ही एक प्रकारच्या तणाची भाजी असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी उगवते. कुरडूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. टाकळ्याची भाजी- टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी असली तरी चविष्ट असते. रानोमाळ टाकळ्याची भाजी येत असून, गवताबरोबर पसरलेली दिसते, त्यात निवडून ती वेचावे लागते. ठाणे, मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडीसारखी ही भाजी विकत मिळते. दिंडा- दिंडा भाजीला पावसाळ्यातील पहिल्याच पावसात कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे. भारंग- भारंग ही रानभाजी जमिनीतून वर आल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या धारदार असतात. भारंगाची सुकी भाजी प्रसिद्ध आहे.