World Vegan Day : वेगन डाएट आहे 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसचं गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:17 PM2018-11-01T17:17:39+5:302018-11-01T17:24:45+5:30

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खानच्या फिटनेसचं गुपित दुसरं-तिसरं काही नसून वेगन डाएट आहे.

अनेक तरूणींची फॅशन आयकॉन असणारी सोनम कपूर फक्त वेगन डाएट फॉलो करते.

आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या ईशा गुप्ताच्या फिगरमागील रहस्य तिचं वेगन डाएट रूटीन आहे.

बॉलिवूडची क्विन कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तीसुद्धा वेगन डाएट फॉलो करते.

चुलबुली म्हणून ओळखली जाणारी जॅकलीन फर्नांडिस वेगन फूडसोबतच वर्कआउटही करते.

अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेला आणि आपल्या हेल्दी बॉडीकडे सर्वांना आपली दखल घ्यायला लावणारा विद्युत जामवालही वेगन डाएट फॉलो करतो.

सध्या सर्वांना आवडणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकटर विराट कोहलीची जोडी देखील वेगन डाएट फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये सहभागी आहे.