चॉकलेटच्या अशा चवी तुम्ही चाखल्या नसतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:46 IST2018-09-06T21:34:53+5:302018-09-06T21:46:51+5:30

जिभेवर गोडवा आणणारी चॉकलेट सर्वांनीच खाल्ली असतील. पण केवळ गोडच नव्हे तर वेगवेगळ्या चवीची चॉकलेट बाजारात उपलब्ध असतात.
ज्यांना बेकन खाणे आवडते त्यांच्यासाठी बेकन चॉकलेट हा चांगला पर्याय आहे. पण शाकाहारी मंडळींनी ही चॉकलेट खाऊ नयेत.
ज्यांना तिखट खाणे पसंत आहे. त्यांच्यासाठी दालचिनी आणि तिखट मिर्चीच्या चवीची दालचिनी मिर्च चॉकलेट स्पायसी चव देऊ शकतात.
तुम्ही चहासोबत फ्रेंच चॉकलेट खाल्ली असतील. पण फ्रेंच टोस्ट चॉकलेट हासुद्धा ब्रेकफास्टसाठी चांगला पर्याय असेल.
भारतीय भोजन आणि भारतीय मसाल्यांच्या चवीचे इंडियन करी चॉकलेट बाजारात आले आहे.