Is your food fake or real find out with these 13 easy tests
तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये केली गेलेली भेसळ ओळखण्यासाठी खास १३ ट्रिक्स! By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:48 PM2019-06-05T14:48:06+5:302019-06-05T15:00:00+5:30Join usJoin usNext सोशल मीडियावर एक पान मिनिटे वेळ घालवला तर सर्फिंग करताना कितीतरी असे व्हिडीओ बघायला मिळतात, ज्यात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ दाखवली जाते. सद्या जमानाच भेसळीचा आहे. पदार्थांमध्ये भेसळ, नात्यांमध्ये भेसळ सगळीकडे भेसळ बघायला मिळते. पण पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या हानिकारक भेसळीपासून तुम्ही बचाव करू शकता. त्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही पदार्थांमधील भेसळ ओळखू शकाल. १) Cheese Slice डुप्लिकेट आहे की ओरिजिनल हे तुम्ही जाळून चेक करू शकता. जे Cheese Slice जळून गळू लागेल ते ओरिजनल असेल आणि जे गळण्याऐवजी काळं पडेल ते डुप्लिकेट असेल. २) आजकाल तांदळात फार भेसळ केली जाते. तांदळात प्लास्टिकच्या दाण्यांची भेसळ केली जाते. हे ओळखण्यासाठी एका गरम भांड्यात कच्चे तांदूळ टाका. यात जर प्लास्टिक असेल तर ते वितळेल. ३) Baby Food मध्ये Fortified Calcium आहे की, नाही हे ओळखण्यासाठी एका छोट्या पॉलिथिनमध्ये बेबी फूड टाका. त्यावरून चुंबक फिरवा. जेवढं Fortified Calcium असेल ते चुंबकाला चिकटेल. ४) Vitamin च्या टॅबलेटची खरी-खोटी ओळख पटवण्यासाठी काही टॅबलेट बेक करण्यासाठी ठेवा. ज्या नॅच्युरल असतील त्या गळणार नाहीत, तर ज्या सिंथेटिक असतील त्या गळतील. ५) आयस्क्रीममध्ये लिंबू पिळलं तर त्यात काही फरक पडणार नाही. पण जर लिंबू पिळल्याने आयस्क्रीममध्ये फेस येत असेल तर मात्र घोळ आहे. एकतर ते डुप्लिकेट असेल नाही तर त्यात डिटर्जंट मिसळलेलं असेल. ६) दुधात तर अलिकडे मोठ्या प्रमाणात भेसळ बघायला मिळते. ही भेसळ ओळखण्यासाठी दुधात Seaweed टाका. हे टाकल्यावर दुधाचा रंग बदलला तर ते डुप्लिकेट आहे असं समजा. ७) ऑइल आणि पाणी मिश्रित करून हे मिश्रण कॉटन बडच्या मदतीने रताळ्यावर घासा. याने त्यातील हानिकारक रंग निघून जाईल. ८) Coffee Lovers साठी कॉफी डुप्लिकेट आहे की, ओरिजिनल हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा कॉफी टाका. कॉफी टाकूनही पाण्याचा रंग बदलत नसेल तर ती कॉफी डुप्लिकेट आहे. कारण ओरिजिनल कॉफीने पाण्याचा रंग लगेच बदलतो. ९) Green Peas हे खरेदी करताना फार गर्द हिरवे दिसतात. पण ते ताजे आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी एक ट्रिक वापरा. मटर पाण्यात उकडा. जर त्यावर रंग लावला असेल तर रंग लगेच निघून जाईल. १०) हळद ही पदार्थांसोबतच ब्युटी प्रॉडक्ट्समध्येही वापरली जाते. त्यामुळे ती डुप्लिकेट आहे की ओरिजिनल हे जाणून घेण्यासाठी हळद जाळा. भेसळ नसलेली हळद जळेल. ११) मधातही मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही ओळखण्यासाठी मेणबत्ती मधात बुडवून पेटवा. जर मेणबत्ती पेटत राहिली तर ते मध खरं आहे. १२) Tea Bag मधील चहापत्ती काढून ती एका बाऊलमध्ये कपडा टाकून त्यात ठेवा. नंतर त्यात थंड पाणी टाका. पाणी टाकताच जर चहापत्ती रंग सोडत असेल तर ती अजिबात वापरू नका. १३) फळं फ्रेश दिसावेत म्हणून त्यावर वॅक्स लावलं जातं. हे ओळखण्यासाठी फळं गरम पाण्यात टाका, त्यांना लावलेलं वॅक्स लगेच निघून जाईल.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यसोशल व्हायरलHealth TipsHealthSocial Viral