your kitchen spices are real or adulterated know how to check its purity
किचनमधील मसाले भेसळयुक्त? कसं ओळखायचं हे जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:26 PM2019-11-21T14:26:21+5:302019-11-21T14:46:44+5:30Join usJoin usNext चविष्ट पदार्थ तयार करण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. मात्र सध्या बाजारात भेसळयुक्त मसाले आले आहेत. भेसळयुक्त मसाल्यांचा वापर केल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. मसाले भेसळयुक्त आहेत की नाही हे कसं ओळखायचं हे जाणून घेऊया. हळद हळदीचा रंग जास्त गडद असेल तर त्यात भेसळ असल्याची दाट शक्यता आहे. शुद्ध हळदीचा रंग हा पिवळा असतो. धने पावडर धने बारीक करून त्यापासून धने पावडर केली जाते. धने पावडरला एक वेगळा सुवास असतो. जर तसा आला नाही तर ती भेसळयुक्त आहे. मीठ बाजारात साधं मीठ आणि आयोडाईज मीठ उपलब्ध आहे. बटाटा कापून त्याचे दोन भाग करा. त्यातील एका भागावर साधं मीठ तर दुसऱ्या भागावर आयोडाईज मीठ लावा. लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. 10 मिनिटानंतर ज्याचा रंग निळा असेल ते आयोडाईज मीठ आहे. रंग बदलला नाही तर साधं मीठ आहे. लवंग लवंगमधील नॅचरल ऑईल काढून टाकल्यावर ती पाण्यावर तरंगते. त्यामुळे लवंग पाण्यावर तरंगली तर ती भेसळयुक्त आहे. दालचिनी भेसळयुक्त दालचिनी बाजारात उपलब्ध आहेत. विविध लोकल कंपनीच्या मसाल्याचे पॅकेट सध्या हमखास मिळतात. मात्र त्याचा वापर करताना काळजी घ्या. टॅग्स :अन्नfood