Zesty lemon pepper will help you in loosing weight
चटपटीत 'लेमन पेपर'नं वजन होणार कमी; आरोग्याच्या इतर समस्याही दूर होण्याची हमी By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 05:09 PM2019-09-08T17:09:40+5:302019-09-08T17:19:06+5:30Join usJoin usNext जर तुम्हाला आंबट पदार्थ खाण्यास आवडत असतील तर हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत स्पायसी आणि चविष्ट लेमन पेपरबाबत. चटपटीत... थोडसं तिखट... थोडसं आंबट असलेलं हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल. तसेच हा पदार्थ आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. लेमन पेपर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आणि हे घरीच अगदी सहज तयार करता येतं. काय आहे लेमन पेपर? लेमन पेपर एक ड्राय सीजनिंग आहे. जे लिंबू आणि काळ्या मिरीपासून तयार केलं जातं. हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच खाण्यासाठी चटपटीत असल्यामुळे सलाड, सूप यांसारख्या पदार्थांवर टाकून खाऊ शकता. कसं करणार तयार? लेमन पेपर घरी तयार करणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे काळी मिरीची पावडर एकत्र करा. मिश्रण पूर्ण कोरडं होइपर्यंत गरम करा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. चवीनुसार मीठही एकत्र करा. न्यूट्रिशनल वॅल्यू एक्सपर्ट्सनुसार, लेमन पेपरमध्ये फॅट्स अजिबात नसतात आणि 0.8 कॅलरी प्रत्येक सर्विंगमध्ये असतात. एवढचं नाहीतर हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मदत करतं. रेग्युलर डाएटमध्ये समावेश केल्याने झटपट वजन कमी करण्यास मदत होते. लिव्हरसाठीही फायदेशीर सकाळी लिंबू पाण्यामध्ये थोडं पेपर लेमन एकत्र करून प्या. लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी हे मदत करतं. एवढचं नाहीतर शरीरातून टॉक्सिन्स दूर करण्यासाठी आणि यूरिक अॅसिड रिलीज करण्यासाठीही लेमन पेपर मदत करतं. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लेमन पेपर तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही पदार्थांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स आणि अॅन्टी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)टॅग्स :पाककृतीपौष्टिक आहारवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सReceipeHealthy Diet PlanWeight Loss TipsFitness TipsHealth Tips