Diletta Leotta calls cops after having watches, jewels and cash stolen in £133k apartment raid
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास! By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:58 AM2020-06-09T11:58:02+5:302020-06-09T12:01:22+5:30Join usJoin usNext इटलीची प्रसिद्ध क्रीडा पत्रकार डॉयल्टा लेओटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सुंदर अँकरच्या घरी चोरी झाली असून तिच्या घरातून 1.27 कोटींचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा दावा तिनं केला आहे. त्यात महागडे घड्याळ, रोख रक्कम आणि दागिन्यांचा समावेश आहे. डॉयल्टा हिचं मिलान येथे अपार्टमेंट आहे. घरी चोरी झाली, तेव्हा ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली होती. वृत्तानुसार डॉयल्टाच्या घरातून 8 घड्याळं, त्यात रोलेक्सचाही समावेश होता. दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. इटालियन फुटबॉल फॅन्समध्ये डॉयल्टा प्रचंड प्रसिद्ध आहे. सीरि ए लीग मॅच कव्हर करण्यासाठी ती स्टेडियवर नेहमी उपस्थित असते. पण, या सुंदर अँकरसोबत स्टेडियमवर गैरवर्तवणूकही झाली होती. गतवर्षी नॅपोली आणि ब्रेशिया यांच्यातला सामना सॅन पाऊलो स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. तेथे नॅपोलीच्या चाहत्यांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती आणि तिला स्टेडियममध्येच टी-शर्ट काढण्याची मागणी केली होती. तिनंही त्या फॅन्सला उत्तर दिले. तिनं त्यांच्याकडे स्मित हास्य केले आणि अंगठा खाली करून दाखवला. टॅग्स :फुटबॉलइटलीFootballItaly