FIFA U-17 World Cup: Even after the defeat, the Indian team won the hearts of the attendees
FIFA U-17 World Cup : पराभवानंतरही भारतीय संघाने उपस्थितांची मने जिंकली By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 12:05 AM2017-10-07T00:05:45+5:302017-10-07T00:16:27+5:30Join usJoin usNext नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणा-या अमेरिकेकडून भारतीय संघाला 3-0 गोलने पराभव पत्करावा लागला. अमेरिकेकडून कर्णधार जोश सार्जेंटने पेनल्टीवर ३१ व्या मिनिटाला, ख्रिस डॉर्किनने ५२ व्या आणि अँड्र्यू कार्लटन याने ८४ मिनिटाला गोल केले. भारतीय खेळाडूदेखील आपल्या पालक आणि प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करू इच्छित होते. त्यात गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्याशिवाय कोमल थाटल आणि सुरेश वांगजाम व फॉरवर्ड अनिकेत जाधव यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली. पराभवानंतरही भारतीय संघाने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघही बनवत इतिहास रचला. हा सामना पाहण्याठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, क्रीडामंत्री राजवर्धन सिंह राठोड सह अनेक दिग्गज व्यक्ती आणि खेळाडूंची उपस्थिती होती. टॅग्स :फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 20172017 FIFA U-17 World Cup