FIFA U-17 World Cup : गोइरीचे दोन गोल; फ्रान्सचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 23:48 IST2017-10-11T23:39:04+5:302017-10-11T23:48:22+5:30

गुवाहाटी : गोइरीच्या दोन गोलच्या बळावर फ्रान्सने जपानचा २-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश पक्का केला.
इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फ्रान्सने सुरुवातीपासून दबदबा निर्माण केला होता.
१३ व्या मिनिटाला जपानचा गोलरक्षक कोसेई तानी याच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू गोलजाळ्यात गेला त्यामुळे फ्रान्सला सहज आघाडी मिळाली.
त्यानंतर जपानने ब-याच संधी निर्माण केल्या. मात्र, त्यांना गोल नोंदवता आला नाही. दुस-या सत्रात फ्रान्सने आक्रमक पवित्रा घेत ७१ व्या मिनिटाला पुन्हा गोल नोंदवला.
या वेळी गोइरी याने यासिन आदिलच्या पासवर गोल नोंदवून संघाची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर जपानला दोन मिनिटांनंतर पेनल्टी मिळाली होती ज्यावर ताईसी मियाशिरी याने गोल नोंदवला. फ्रान्सचा हा सलग दुसरा विजय आहे. त्यांचे दोन सामन्यांतून सहा गुण झाले आहेत.