FIFA World Cup 2018 : भारतातल्या मेस्सीच्या चाहत्यानं घराला बनवलं 'अर्जेंटिना हाऊस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 23:03 IST2018-06-12T23:03:12+5:302018-06-12T23:03:12+5:30

रशियामध्ये 21व्या फिफा विश्वचषकाची सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक उरले असतानाच भारतातील फुटबॉल प्रेमींमध्येही प्रचंड उत्साह संचारला आहे.

कोलकातातला एक फुटबॉल प्रेमी शिवशंकर पात्रानं स्वतःच्या घराला अर्जेंटिना हाऊस बनवून टाकलं आहे.

शिवशंकर पात्रा हे एक चहावाले असून, फुटबॉलपटू स्टार लियोनेल मेस्सीचे जबरा फॅन आहेत.

दर चार वर्षांनी जेव्हा फिफा वर्ल्ड कप होतो, त्यावेळी पात्रा स्वतःच्या तीन मजल्यांचं घर आणि दुकानाला निळ्या आणि पांढ-या रंगात रंगवून टाकतो.

रशियाला जाण्यासाठी त्यांनी 60 हजार रुपये जमवले होते.

परंतु रशियाला जाण्यास 60 हजार रुपये पर्याप्त नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या तीन मजल्यांच्या घराला अर्जेटिंना हाऊस बनवून टाकलं.

कोलकात्यामधील परगणा जिल्ह्यातल्या ईछापूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कोणालाही अर्जेंटिना चहाचं दुकान विचारल्यास तुम्हाला कोणीही तिकडचा मार्ग सांगेल.

पात्रा हे मेस्सीची स्वाक्षरी असलेल्या 100 जर्सीही लहानग्यांना वाटणार आहेत.