फुटबॉलपटूंची भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:34 IST2018-07-19T16:31:25+5:302018-07-19T16:34:39+5:30

विश्वचषक स्पर्धेतील इजिप्तचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्या संघातील प्रमुख खेळाडू मोहम्मद सलाह हा सध्या इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी लिव्हरपूलला दाखल झाला आहे. येथील समुद्र किना-यावर तो सुट्टीचा आनंद घेत आहे.
अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी पत्नी अँटोलेना रोकुज्जोसह बॅलेरीच येथे फिरायला गेला आहे.
युव्हेंटस संघ जॉइन करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रेयसी जॉर्जिया रॉड्रीगेज आणि मोठा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर यांच्यासह वेकेशनसाठी ग्रीसमध्ये दाखल झाला आहे.
बेल्जियमचा प्रमुख खेळाडू इडन हॅझार्ड आपल्या मित्रांसोबत स्पेनमध्ये भटकंती करत आहे.