FIFA World Cup 2022 मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:55 AM2022-12-03T11:55:51+5:302022-12-03T11:59:53+5:30

FIFA World Cup 2022 स्पर्धेत खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड्सही खूप चर्चेत आहेत. या यादीत फ्रेंच संघाचा खेळाडू थिओ हर्नांडेझची पत्नी झो क्रिस्टोफोली ( Zoe Cristofoli) हिचाही समावेश आहे

FIFA World Cup 2022 स्पर्धेत खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड्सही खूप चर्चेत आहेत. या यादीत फ्रेंच संघाचा खेळाडू थिओ हर्नांडेझची पत्नी झो क्रिस्टोफोली ( Zoe Cristofoli) हिचाही समावेश आहे. क्रिस्टोफोली तिच्या टॅटूमुळे खूप चर्चेत आहे.तिने शरीराच्या बहुतांश भागांवर टॅटू गोंदवले आहेत.

थियो हर्नांडेझची पत्नी क्रिस्टोफोली एक इंस्टाग्राम मॉडेल आणि ब्लॉगर आहे. झो क्रिस्टोफोलीला टॅटू मॉडेल देखील म्हटले जाते.

FIFA वर्ल्ड कप २०२२ ध्ये राऊंड १६ मध्ये स्थान मिळवणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला होता. यादरम्यान झो क्रिस्टोफोली फ्रान्सच्या सर्व सामन्यांमध्ये मैदानात दिसली.

२६ वर्षीय झो क्रिस्टोफोलीचे अर्जेंटिनाचा खेळाडू सर्गियो अॅग्युरोसोबतच्या अफेअरही चर्चा होती आणि २०१८ मध्ये दोघेही एका क्लबबाहेर एकत्र दिसले होते.

झो क्रिस्टोफोली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर १.१ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिन शेअर केलेले फोटो चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा सामना पोलंडशी होणार आहे. हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याकडे फ्रान्सचे लक्ष असेल.