Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:59 IST2020-03-24T10:54:45+5:302020-03-24T10:59:47+5:30
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रीडापटूंच्या मिळकतीवरही परिणाम झालेला दिसत आहे. जगभरातील श्रीमंत फुटबॉलपटूंना याची सर्वाधिक झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या मिळकतीत मोठी कपात झालेली पाहायला मिळेल. या प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नात किमान कोट्यवधींचा घट झालेला पाहायला मिळेल. पण त्यांची गतवर्षीची कमाईचा आकडा पाहून तुम्हाला धक्का नक्की बसेल. या फुटबॉलपटूंची 2019चे उत्पन्न जाणून घेऊया...

मोहम्मद सलाह 1 अब्ज 91 कोटी 29 लाख 33,750
गॅरेथ बेल 2 अब्ज 06 कोटी 46 लाख 27,050
अँटोनीए ग्रिझमन 2 अब्ज 10 कोटी 98 लाख 39,750
ऑस्कर 2 अब्ज 20 कोटी 92 लाख 92,500
मेसूट ओझील 2 अब्ज 30 कोटी 07 लाख 11,500
कायलिन मॅप्बापे 2 अब्ज 33 कोटी 11 लाख 08,000
अॅलेक्सी सांचेज 2 अब्ज 34 कोटी 73 लाख 45,000
आंद्रेस इनिएस्टा 2 अब्ज 47 कोटी 69लाख 06,250
पॉल पोग्बा 2 अब्ज 51 कोटी 56 लाख 39, 500
नेयमार 8 अब्ज 02, 500
ख्रिस्तियानो रोनाल्डो 8 अब्ज 30 कोटी 47 लाख 64, 500
लिओनेल मेस्सी 9 अब्ज 68 कोटी 62 लाख 90,000