भावा तिला सोड, ती...! अर्जेंटिनाच्या सुपरस्टारला गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी २० हजार स्वाक्षरींचे पत्र, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 04:18 PM 2023-01-05T16:18:27+5:30 2023-01-05T16:21:02+5:30
अर्जेंटिनाने कतारमध्ये झालेला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार केले... कारकीर्दितील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मेस्सीने विजयी चषक उंचावला... पण, या सामन्यात युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझ हाही चर्चेत आला. ज्युलियन अल्वारेझने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार खेळ दाखवत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. २२ वर्षीय फॉरवर्ड ज्युलियन अल्वारेझने सात सामन्यांमध्ये चार गोल केले आहेत आणि तो शेवटपर्यंत गोल्डन बूटच्या शर्यतीत होता. आता हा स्टार खेळाडू एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला आहे. ज्युलियन त्याची गर्लफ्रेंड मारिया एमिलिया फेरेरोमुळे चर्चेत आहे.
ज्युलियन अल्वारेझचे २० हजाराहून अधिक चाहते स्टार फॉरवर्डला त्याच्या मैत्रिणीशी ब्रेकअप करण्यास सांगत आहेत. हे विचित्र वाटतंय ना... पण हे खरं आहे. २० हजाराहून अधिक चाहत्यांनी मँचेस्टर सिटीच्या फॉरवर्ड ज्युलियन अल्वारेझला गर्लफ्रेंड मारिया एमिलिया फेरेरोसोबत ब्रेकअप करण्याचे आवाहन करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.
कतार येथे २०२२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार कामगिरीमुळे ज्युलियन अल्वारेझ अर्जेंटिनात खळबळ माजवली होती. मँचेस्टर सिटी फॉरवर्डने सात सामन्यांमध्ये चार गोल केले आणि मेस्सीच्या मागे अर्जेंटिनाचा दुसरा आघाडीचा गोल करणारा खेळाडू म्हणून उदयास आला. केवळ लिओनेल मेस्सीने ( ७ गोल) त्याच्यापेक्षा जास्त गोल केले. पण हे सगळं असूनही अल्वारेझच्या गर्लफ्रेंडवर चाहते का नाराज आहेत?
जुनिलियन अल्वारेझने अर्जेंटिनातील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. यावेळी त्याची गर्लफ्रेंड मारिया एमिलिया फेरेरोही त्याच्यासोबत होती. अल्वारेझने त्याच्या गावी कॅलाचिनमध्ये परेडचे नेतृत्व केले, फायर इंजिनच्या छतावर बसून आणि चाहत्यांसह मनापासून आनंद साजरा केला. डेली स्टारच्या वृत्तानुसार, कॉर्डोबापासून ६५ मैलांवर असलेल्या छोट्या शहरात १० हजाराहून अधिक लोकांनी उत्सवात भाग घेतला.
अल्वारेझच्या फेरेरोसोबतच्या चार वर्षांच्या संबंधांवर याचिकेचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी एकत्र नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला आणि इन्स्टाग्रामवर त्यांचा फोटोही शेअर केला. मारिया एमिलिया फेरेरो सामाजिक नेटवर्कवर सामग्री तयार करते. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे दीड लाख फॉलोअर्स आहेत.
मारिया एमिलिया फेरेरोचा जन्म अर्जेंटिना येथे झाला. ती हॉकीपटू आहे. मारिया एमिलिया फेरेरो आणि ज्युलियन अल्वारेझ यांच्या दोघांच्या जन्मात फक्त ५ महिन्यांचा फरक आहे.
ज्युलियन अल्वारेझची मैत्रीण मारिया एमिलिया फेरेरो देखील परेडचा एक भाग होती, परंतु तिच्या एका कृतीमुळे चाहत्यांचा राग आला. खरं तर, एका क्षणी फेरेरो मँचेस्टर सिटी फॉरवर्डला तरुण चाहत्यांच्या गटासह चित्रासाठी पोझ देण्यापासून थांबवताना दिसला.
ज्युलियन अल्वारेझची मैत्रीण मारिया एमिलिया फेरेरोच्या कृत्यामुळे एका चाहत्याला इतका राग आला की त्याने फुटबॉलपटूला त्याच्या गर्लफ्रेंडला सोडण्यासाठी ऑनलाइन याचिका तयार केली. या याचिकेवर २० हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.