Corona Virus : लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 10:43 AM2020-04-07T10:43:50+5:302020-04-07T10:47:15+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अनेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत.

पण, काही लोकं या लॉकडाऊनला गांभीर्यानं घेत नाही. अजूनही लोकं रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. इंग्लंडमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहेत.

इंग्लंड संघाचा आणि मँचेस्टार सिटी क्लबचा दिग्गज फुटबॉलपटून कायले वॉकरनं लॉकडाऊनचा नियम मोडला आणि आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याय कायले वॉकरनं गतआठवड्यात घरात सेक्स पार्टीसाठी कॉलगर्ल्सना बोलावण्याचा प्रताप केला.

29 वर्षीय फुटबॉलपटूनं सेक्स पार्टीसाठी दोन कॉलगर्ल्सना बोलावलं होतं. त्याच्या या सेक्स पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्यानं घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली, परंतु मँचेस्टर सिटी क्लबने या कृत्यावर तीव्र नाराजी प्रकट केली. क्लबने वॉकरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्टनुसार त्या दोन कॉलगर्ल रात्री 10.30च्या सुमारास वॉकरच्या घरी आल्या आणि वॉकरनं त्याना त्याचं नाव कायले सांगितले.

लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा वॉकर हा पहिलाच फुटबॉलपटू नाही.

यापूर्वी अॅस्टन व्हिलाचा कर्णधार जॅक ग्रिलीशनं उल्लंघन केले. त्यानं काही दिवसांपूर्वी रस्त्यावर पार्टि केली होती.