नेमारला स्वित्झर्लंडचा 'दे मार', आठ वेळा मैदानावर आपटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 18:43 IST2018-06-18T18:43:38+5:302018-06-18T18:43:38+5:30

जगातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या नेमारला स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी जखडून ठेवले होते. त्याला आठवेळा मैदानात पाडले.

दुखापतीतून सावरलेला नेमार विश्वचषकात कशी कामगिरी बजावतो, याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

मात्र नेमारला सलामीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं.