No Ferrari, No Cooper ... Sports stars who love to drive Porsche
ना फेरारी, ना कूपर... 'ही' आहे जगभरच्या स्पोर्ट्सस्टारची फेव्हरिट कार By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:22 PM2019-02-12T15:22:03+5:302019-02-12T15:25:10+5:30Join usJoin usNext जगभरातील अव्वल खेळाडू आजच्या घडीला मॅच फी, प्रायोजक आदींतून खोऱ्यानं पैसे कमावत आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्या आवडीनिवडीही तितक्याच महागड्या असणारच. त्यात गाड्या या खेळाडूंची आवडती गोष्ट.... काही खेळाडूंकडे तर डझनभर कार आहेत. पण, पोर्श ही महागडी गाडी मोजक्याच खेळाडूंकडे आहे. जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेली टेनिसपटू अँजेलिक कर्बरकडे पोर्श 911 ही गाडी आहे. ती जर्मनीत या गाडीची सदिच्छादूत आहे. भारताचा एकमेव फॉर्म्युला वन चालक नरिन कार्तिकेयन याच्याकडेही पोर्श 911 GT3 ही गाडी आहे. भारताला 1983चा वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनीही पोर्श पॅनामेरा डिझेल ही कार खरेदी केली आहे. ही कार 6.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग गाठू शकते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याच्याकडेही पिवळ्या रंगाची पोर्श बॉक्स्टर ही गाडी आहे. पोर्शची ही स्पोर्ट कार आहे. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे महागड्या गाड्यांचे म्युझियमच आहे. पण त्याच्याकडे पोर्शच्या एक नव्हे तर तीन गाड्या आहेत. रोनाल्डोकडे Porsche Cayenne, a Porsche 911 Carrera 25 Cabriolet and a Porsche Cayenne Turbo या गाड्या आहेत. टॅग्स :ख्रिस्तियानो रोनाल्डोकपिल देवसुरेश रैनाCristiano RonaldoKapil DevSuresh Raina