लिओनेल मेस्सीच्या टीशू पेपरसाठी साडेचार कोटींची बोली, हॉट मॉडेलची न्यूड फोटो काढण्याची तयारी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:22 AM 2021-08-24T11:22:49+5:30 2021-08-24T11:28:02+5:30
मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain ) क्लबकडून खेळताना दिसेल आणि दोन वर्षांच्या करारासाठी त्याल बक्कळ पैसाही दिला जाणार आहे. PSG सोबत त्यानं ३०० कोटींचा करार केला आहे. बार्सिलोना क्लबची सुपर फॅन अन् प्ले बॉय मॉडेल लॉना सँडीएय हिनं क्लबचा माजी स्टार लिओनेल मेस्सी याच्या 'त्या' टीशू पेपरसाठी ४ कोटी, ४४ लाख ७८,०२४ रुपये मोजण्याचीही तयारी तिनं दर्शवली आहे. ( BARCELONA super-fan and Playboy model Luana Sandien has offered almost HALF A MILLION pounds for Lionel Messi's teary handkerchief.)
३४ वर्षीय मेस्सी बार्सिलोना क्लबच्या निरोप समारंभारात ढसाढसा रडला होता. त्याची पत्नी अँटोनेला रोकुझ्झो हिनं त्याला अश्रु पुसरण्यासाठी टीशूपेपर दिले होते आणि ते टीशू एका चाहत्यानं लिलावासाठी ठेवले आहेत. ही संधी लॉनाला सोडावीशी वाटली नाही आणि तिनं त्यासाठी ६ लाख डॉलर म्हणजेच जवळपास साडेचार कोटींची बोली लावली.
ती म्हणाली, ''मेस्सीच्या टीशूपेपरसाठी मी ६ लाख डॉलरची बोली लावली. पण, त्यानंतर ती जाहीरात दिसेनाशी झाली. माझ्या बोलीनंतर मी तो लिलाव जिंकली असे मला वाटले, परंतु आता ती जाहीरात दिसतच नाही. आशा आहे की मी बोली जिंकली असावी.''
ब्राझिलियन मॉडेल अजूनही संभ्रमात आहे. त्या टीशू पेपरसोबत मॉडेलनं न्यूड फोटोशूट करण्याची तयारी दर्शवली होती. २७ वर्षीय मॉडेल बार्सिलोनात राहते आणि काही दिवसांआधी तिनं बार्सिलोनाचे खेळाडू हे अन्य संघातील खेळाडूंपेक्षा अधिक सेक्सी असतात असे मत व्यक्त केले होते.
तिनं बार्सिलोना क्लबच्या जर्सीत एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं आणि त्यामुळे त्या मॅगझिनचा खप ५०%नी वाढला होता.
२००० साली वयाच्या १६ वर्षी बार्सिलोना क्लबकडून लिओनेल मेस्सीनं पदार्पण केलं. २१ वर्षांनंतर त्यानं क्लब सोडण्याचा निर्णय घेतला अन् निरोपाच्या भाषणात त्याला रडताना पाहून चाहतेही हळहळले.
मेस्सीनं बार्सिलोनाकडून ७७८ सामन्यांत ६७२ गोल्स करून दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा एकाच क्लबकडून सर्वाधिक ( ६४३ गोल्स, सँटोस क्लब) गोल्स करण्याचा विक्रम मोडला. ला लिगा स्पर्धेच्या ८ हंगामात व चॅम्पियन्स लीगच्या ६ हंगामात सर्वाधिक गोल्सचा विक्रम केला.
चार चॅम्पियन्स लीग, १० ला लिगा यासह ३४ प्रमुख स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही त्यानं बार्सिलोनाकडून केला अन् सलग चार असे एकूण सहा बॅलोन डी ओर पुरस्कारही त्याने जिंकले.