ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मुलगा येणार अडचणीत; 'त्या' व्हिडीओनंतर पोलीस करणार तपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 04:44 PM2020-07-13T16:44:08+5:302020-07-13T16:47:02+5:30

जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा मुलगा ज्युनियर ख्रिस्तियानो अडचणीत येण्याची शक्यता आहे.

रोनाल्डोची बहीण एल्मा हीनं रोनाल्डोच्या 10 वर्षीय मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

त्यानंतर हा वाद निर्माण झाला. आता पोलीसांनी तपासाची तयारी दर्शवली आहे.

एल्मा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत रोनाल्डोचा मुलगा जेट स्की चालवताना दिसत होता.

नियमानुसार लहान मुलगा जेट स्की चालवू शकत नाही, त्यामुळे आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एल्मानं तो व्हिडीओ डिलीट केला.

शनिवारी रोनाल्डोचा मुलगा काही नातेवाईकांसह फिरायला गेला होता. तेव्हा त्यानं जेट स्की चालवली.

पोलीस प्रमुख गौरेईरो कार्डोसो यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली. रोनाल्डोच्या मुलाला 25 हजार ते 2.54 लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

शिवाय त्या खासगी फर्म किंवा ग्रुपला 10 लाखांचा दंड भरावा लागू शकतो, असेही पोलिसांनी सांगितले.