फिफा वर्ल्डकपमधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा! पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 10:36 AM2022-11-26T10:36:01+5:302022-11-26T10:42:33+5:30

Kieffer Moore FIFA World Cup : वेल्स संघाचा स्टार स्ट्रायकर किफर (Kieffer Moore) मूरे आहे.

कतारमध्ये आयोजित फिफा विश्वचषक 2022 हंगामात वेल्स संघाने सुरुवात चांगली केली आहे. संघाने पहिला सामना अमेरिकेविरुद्ध 1-1 असा बरोबरीत खेळला होता. तर दुसऱ्या सामन्यात इराणविरुद्ध वेल्सला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला.

वेल्स संघाचा स्टार स्ट्रायकर किफर (Kieffer Moore) मूरे आहे. किफरची जादू फिफाच्या या हंगामात आतापर्यंत काम करू शकली नाही. कीफरने वेल्स संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

30 वर्षीय किफर मूरेने अद्याप लग्न केलेले नाही. पण, ब्रिटीश मॉडेल शार्लोट रसेलशी (Charlotte Russell) ही किफरची गर्लफ्रेंड आहे. शार्लोट रसेल सोशल मीडिया सेन्सेशन आहे आणि सतत पोस्ट शेअर करत असते.

शार्लोट रसेल सुद्धा स्टार फुटबॉलपटू किफर मूरेला सेलिब्रेट करण्यासाठी कतारला पोहोचली आहे. या फिफा विश्वचषकापूर्वी दोघांनी एकत्र वेळ घालवला होता आणि किफर आणि शार्लोट एका हॅलोविन पार्टीतही दिसले होते.

बोर्नमाउथ क्लबचा स्ट्रायकर किफर मूरेसोबत गर्लफ्रेंड शार्लोटही कतारला पोहोचली आहे. फिफीच्या सामन्यांमध्ये किफरला चिअर्स करताना दिसत आहे. याआधी शार्लोटने युरो 2020 मध्ये सुद्धा किफर मूरेला सपोर्ट केला होता.

किफरची गर्लफ्रेंड शार्लोटने गेल्या महिन्यातच बीचवर अनेक फोटोशूट केले होते. हे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यासोबतच शार्लोटने फिफा विश्वचषकासाठी येथे आल्याबद्दल आपल्या संघाचे आभारही मानले होते.

आतापर्यंत वेल्स संघाने फिफा विश्वचषक 2022 हंगामात दोन सामने खेळले आहेत. यातील पहिला सामना अमेरिकेसोबत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तर दुसऱ्या सामन्यात इराणने 2-0 ने पराभूत केले.

आता वेल्स संघाचा तिसरा सामना 30 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, फिफा विश्वचषकातून वेल्स संघ जवळपास बाहेर जाण्याची शक्यता आहे.