विदेशी फुटबॉल क्लबबरोबर करार करणारी बाला देवी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:57 PM2020-02-03T22:57:59+5:302020-02-03T23:01:16+5:30

भारतीय महिला फुटबॉल टीमची खेळाडू बाला देवीनं स्कॉटलंडच्या फुटबॉल क्लब रेंजर्ससोबत करार केला आहे. त्यामुळे ती आता चर्चेत आली आहे.

बाला देवीने भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा किताब पटकावला आहे. तिच्या नावावर 58 सामन्यांत 52 गोल जमा आहेत.

दक्षिण आशिया विभागातील ती सर्वाधिक गोल करणारी एकमेव खेळाडू आहे. वयाच्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बाला देवीने भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.

गेल्या दोन मोसमांपासून भारतीय महिला फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान तिने पटकावला आहे.

. तिने 2015 आणि 2016मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे.

.बाला देवी हिचा जन्म 2 फेब्रुवारी 1990 झाला. त्यानंतर तिनं फुटबॉलच्या प्रशिक्षणाचे धडे गिरवले.

ती भारतीय राष्ट्रीय टीमची कर्णधार राहिली आहे. तिनं ईस्टर्न स्पोर्टिंग युनियनबरोबर भारतीय महिला लीगच्या क्वालिफायर खेळली आहे.