हेमलकसा येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केलं नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:37 PM2019-08-09T15:37:01+5:302019-08-09T15:40:01+5:30

जागतिक आदिवासी दिवसानिमित्त लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथे जगातील विविध भागात असलेले आदिवासी समुदायाचे वेषभूषा प्रदर्शन तसेच त्यांच्या संस्कृतीविषयी माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी झुलू, माडीया, मसई, मोरान ईत्यादी आदिम समुदायाची वेषभूषा व निवडक खेळ सादर केले. विद्यार्थ्यांनी गावात जाऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला. तसेच वृक्षारोपण करून आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. मुले खूप आनंदात होती.

डॉ. दिगंत आमटे आणि समीक्षा अनिकेत आमटे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सर्वांनी आदिवासी नृत्यात सहभाग घेवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.