गोवा पर्यटकांनी हाऊसफुल्ल, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 20:11 IST2017-12-25T20:05:45+5:302017-12-25T20:11:01+5:30

गोवा : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लक्षणीय संख्येने पर्यटक आलेले आहेत.
समुद्रकिना-यांसह सर्वत्र पर्यटकांची गर्दी उसळली आहे.
गेल्या दोन दिवसात एक लाखाहून अधिक पर्यटक गोव्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन आहे.
येत्या 27 ते 29 या कालावधीत वागातोर येथे ‘टाइम आउट सेव्हंटी टू’ हा ईडीएम होणार आहे.
या डान्स पार्टीलाही हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावणार असून वाहतुकीचे आणखी तीन-तेरा वाजण्याची शक्यता आहे.
31 जानेवारीपर्यंत विशेषत: सायंकाळनंतर वाहतुकीचा मेगाब्लॉक हा कायम असतो.
झुवारी आणि मांडवी नदीवर नव्या पुलांचं काम चालू असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे.
कळंगुट, कांदोळी, हणजुण तसेच दक्षिणेतील कोलवा, बेतालभाटी, बाणावली किनारी भागातही कोंडी झाल्याने वाहने अनेक तास खोळंबल्याचे दिसून आले. (सर्व छाया : गणेश शेटकर)