Govekar's 'Sanjao' festival
गोवेकरांचा 'सांजाव' उत्सव By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 03:11 PM2018-06-24T15:11:48+5:302018-06-24T15:17:57+5:30Join usJoin usNext पणजी : संत जॉन बाप्तिस्ता म्हणजेच जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो. गोव्यात आज रविवार साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सांजाव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे . हल्ली अनेक ठिकाणी स्विमिंग पूल आढळतात, या स्विमिंग पुलमध्येही उड्या मारून उत्सवाचा आनंद लुटला जातो. डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट व फुलांच्या माळा, हातात माडाचे पिडे (फांदी), व अन्य वाद्ये वाजवित-नाचत-गात लोक गटागटाने फिरतात. राज्यातील विहिरी, तलावात उड्या मारून मौजमस्ती करतात. डोक्यावर गोलाकार आकाराची चक्रे सजवतात. त्यांना कॉपेल म्हणतात. कॉपेल फुलांनी सजवतात. वातावरण आनंदी असते. या आनंदात दिवस कधी संपतो ते कळत नाहीत. निसर्गाला जपण्याचा संदेशही सांजावद्वारे दिला जातो. या दिवशी सासरवाडीला येणा-या जावयाचा मोठा सन्मान केला जातो. संपूर्ण गोव्यातच सांजाव साजरा केला जात असला तरी उत्तर गोव्यातील शिवोली येथे बोट फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी बोटी आकर्षकपणे सजविल्या जातात.विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. यंदा हा कार्यक्रम शिवोली पारंपारिक सांजाव बोट फेस्टिव्हल सांस्कृतिक समिती आणि कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. (सर्व फोटो - जयेश नाईक)टॅग्स :गोवाgoa