गोव्यात होळी अन् रंगोत्सव साजरा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 23:14 IST2018-03-02T23:14:45+5:302018-03-02T23:14:45+5:30

गोव्यात ठिकठिकाणी होळी अन् रंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
अपप्रवृत्तीचे दहन व्हावे या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे.
यावेळी शहरात अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्ये वाजवून होळीचा उत्सव साजरा करण्यात आला.
होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह यावेळी तरुणाईला आवरला नाही.
या उत्सवाचा आनंद शहरात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सुद्धा घेतला.(सर्व फोटो - गणेश शेटकर)