आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा(इफ्फी) रंगारंग समारोप By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 04:50 PM 2017-11-29T16:50:19+5:30 2017-11-29T17:00:14+5:30
गेले दहा दिवस भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने(इफ्फी) गोवा सरकार आणि सरकारचे सारे प्रशासन इफ्फीच्याच मूडमध्ये होते. मंगळवारी इफ्फीचा समारोप झाला.
इफ्फीच्या समारोप सोहळ्य़ाला पर्रीकर सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहिले.
गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या रंगारंग सोहळ्यात इफ्फी पुरस्कार सोहळा पार पडला.
मोरोक्क्को येथे जन्मलेल्या फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या १२0 बीटस पर मिनिट या चित्रपटाने गोवा येथील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकाविला.
चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, नेहूल पर्झ बिस्कार्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सत्ताधारी भाजपचे हजारो कार्यकर्ते समारोप सोहळ्य़ात सहभागी झाले. गेल्या 20 नोव्हेंबर रोजी इफ्फीचे उद्घाटन झाले होते.
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ हे देखील यांची उपस्थिती लक्षणीय होती.