The mixed response of workers to the nationwide bandh in Goa
गोव्यात कामगारांच्या देशव्यापी बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:40 PM2019-01-09T20:40:20+5:302019-01-09T20:47:52+5:30Join usJoin usNext विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला गोव्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड झाली. कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणल्या होत्या परंतु त्या अपुºया पडल्या. लोकांना कदंब बसगाड्यांची तासन्तास वाट पहावी लागत होती. राजधानीतील बस स्थानकावर सकाळी एक दोन खाजगी बसेस आल्या. खाजगी बसेस नंतर बंद ठेवण्यात आल्या. रिक्षा, मोटरसायकल पायलटांनी व्यवसाय चालू ठेवला त्यामुळे त्यांची बरीच कमाई झाली. बाजारपेठा चालू होत्या परंतु लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. डिचोलीत बुधवारी आठवड्याच्या बाजारावरही परिणाम झाला. चोडण आणि दिवाडी येथील फेरीबोटी सकाळी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. बस स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर दहा कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. टॅग्स :भारत बंदBharat Bandh