Nobel science exhibition begins in Panaji
नोबेल विज्ञान प्रदर्शनाची पणजीत जय्यत तयारी सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 11:23 PM2018-01-29T23:23:13+5:302018-01-29T23:25:40+5:30Join usJoin usNext येत्या गुरुवारपासून पणजीत (दि. 1 फेब्रुवारी) सुरू होणा-या दुस-या ‘नोबेल प्राईज सिरीज’ या कार्यक्रमाची तयारी वेगाने सुरू आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी कला अकादमीच्या दर्यासंगमावर खास वातानुकूलित शामियाना उभारण्यात आला आहे. या शामियान्यात स्वीडनसह अन्य देशातील तंत्रज्ञ विज्ञान प्रदर्शनाची तयारी करीत आहेत. जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून पाहिले गेलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांचे 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी या काळात गोव्यात वास्तव्य राहणार आहे. या खास शामियान्यात तारांगणासारखी सजावट केली जात आहे. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.टॅग्स :गोवाgoa