गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:28 IST2017-10-18T15:25:15+5:302017-10-18T15:28:04+5:30

गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
गोव्यातील प्रत्येक गाव, खेडे आणि शहरात तयार केल्या गेलेल्या उंच, लहान-मोठ्या अशा हजारो नरकासूर प्रतिमांचे दहन करण्यात आले आणि तेजोमय दिपावलीला गोव्यात आरंभ झाला.
गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
गोवा आणि कोकणातील काही भागांमध्ये नरकासूर प्रतिमा तयार करण्याची प्रथा आहे. गेले महिनाभर खपून गोव्यातील युवकांनी हजारो नरकासूर प्रतिमा तयार केल्या होत्या. पर्यटकांसाठी ही नरकासूर प्रतिमा आकर्षण ठरल्या.
गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
नरकासूर म्हणजे राक्षस. त्याचा श्रीकृष्णाने वध केला अशी कथा आहे. फटाक्यांची आतषबाजी करत गोमंतकीयांनी बुधवारी पहाटे सगळ्या नरकासूर प्रतिमा जाळल्या व अंधारावर प्रकाशाने मात केली असा संदेश दिला गेला. काही भागांत नरकासूर प्रतिमांच्या स्पर्धाही पार पडल्या.
गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
गोमंतकीयांनी तयार केलेल्या हजारो नरकासूर प्रतिमांचे पहाटे पाचच्या सुमारास दहन केले गेले आणि नंतर गोमंकीयांच्या घरासमोर पणत्या पेटल्या व रंगीबेरंगी आकाशदिवे लागले.
गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात
दरम्यान, गोव्यातील एक ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोव्यात नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यास आक्षेप घेतला आहे. नरकासुरांऐवजी श्रीकृष्ण प्रतिमा तयार केल्या जाव्यात आणि श्रीकृष्ण प्रतिमांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात असे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी केले आहे.