मृत्यूच्या १५ मिनिटांपूर्वी डोक्यात कोणते विचार येतात? कॅमेऱ्यानं पहिल्यांदाच टिपलं, रहस्य उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:38 PM2022-02-23T21:38:17+5:302022-02-23T21:42:46+5:30

शेवटच्या घटका मोजत असताना डोक्यात नेमकं काय सुरू असतं; अखेर रहस्य उलगडलं

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडतं, त्याच्या डोक्यात काय सुरू असतं, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. मृत्यू एखाद्या व्यक्तीला गाठतो. त्याआधी त्याच्या मेंदूत नेमकं काय चाललेलं असतं या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

माणूस आपल्या आयुष्यातील शेवटच्या काही मिनिटांमध्ये नेमका काय विचार करतो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यात विज्ञानाला यश आलं आहे. माणसाचा मेंदू विज्ञानासमोरचं मोठं रहस्य आहे. या मेंदूशी संबंधित एक रहस्य उलगडण्यात यश आलं आहे.

माणूस जेव्हा आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत असताना त्याच्या मेंदूत काही आठवणी ताज्या होत असताता. आयुष्यातील गोड आठवणींना त्याचा मेंदू उजाळा देत असतो, असं संशोधन सांगतं.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार, एका रुग्णालयात एका ८७ वर्षीय रुग्णावर उपचार सुरू होते. त्याला इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (ईईजी) जोडण्यात आला होता. उपचार सुरू असताना रुग्णाला अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

रुग्णाच्या मृत्यूपूर्वीची १५ मिनिटं इलेक्ट्रोएन्सेफलोग्राममध्ये रेकॉर्ड झाली. मृत्यूपूर्वी तो रुग्ण त्याच्या आयुष्यातील चांगले क्षण आठवून पाहत होता. मृत्यूआधीची १५ मिनिटं ईईजीमध्ये रेकॉर्ड झाली. मृत्यूच्या ३० सेकंदाआधी रुग्णाच्या हृदयाचे ठोके अतिशय वेगानं पडत होते. त्यामुळे ईईजीमध्ये एक अद्भुत लहर दिसली. या लहरीला Gamma Oscillations म्हटलं जातं.

मृत्यूपूर्वी रुग्णाचा मेंदू अतिशय सक्रीय होता. एखादं स्वप्न पाहताना जशी स्थिती असते, तशीच स्थिती मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या काही मिनिटांत टिपली गेली. त्यावेळी आपलं शरीर संपलेलं असतं. पण यावेळी मेंदू सुरू असतो.

मृत्यूपूर्वी माणसाच्या मेंदूत नेमकं काय सुरू असतं, याबद्दल लुइसविले जेमर विद्यापीठाचे न्यूरोसर्जन डॉ. अजमल जेमर यांनी संशोधन केलं. Gamma Oscillations लहरींदरम्यान आपला मेंदू जुने क्षण आठवण्याचं काम सुरू करतो. आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी, क्षण आठवण्याचं काम यावेळी मेंदूकडून सुरू असतं.

माणसाच्या डोक्यात अशा प्रकारच्या लहरी पहिल्यांदाच दिसून आल्या आहेत. त्यामुळे अवयव दानातील आव्हानं वाढली आहेत. याआधी अशा प्रकारची लहरी उंदरांच्या मेंदूंमध्ये आढळून आल्या होत्या.