किडनीसाठी खूप फायदेशीर आहेत हे 3 लेमन ड्रिंक्स, होणार नाही कोणतीही समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 02:41 PM2022-07-28T14:41:32+5:302022-07-28T14:51:49+5:30

Kidney Health: तुम्हाला जर तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर चला जाणून घेऊ कशाप्रकारचं ड्रिंक तुम्ही सेवन करावं आणि कशाप्रकारे करावं.

Lemon Drinks for Kidney: किडनी शरीरातील रक्त स्वच्छ करणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करते. पण अनेकदा हेच विषारी पदार्थ किडनीला डॅमेज करतात आणि किडनी फेल होते. पण रोज खासप्रकारचं एक ड्रिंक पिऊन तुम्ही किडनी फेल होण्यापासून वाचवू शकता. तुम्हाला जर तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर चला जाणून घेऊ कशाप्रकारचं ड्रिंक तुम्ही सेवन करावं आणि कशाप्रकारे करावं.

किडनीचं मुख्य काम शरीरातील विषारी पदार्थ आणि तरल पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढणं. त्यासोबतच किडनी मानवी शरीरात सोडिअम, पोटॅशिअम व अॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्याचं कामही करते. सोबतच किडनीमधून असे काही हार्मोन्स निघतात जे शरीरातील इतर अवयवांच्या क्रियांसाठी फायदेशीर असतात.

किडनीसाठी फायदेशीर लिंबू - हार्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, रोज लिंबाचा रस प्यायल्याने यूरिन सायट्रेट वाढतं आणि किडनीमधून टॉक्सिन्स बाहेर निघतात. तेच जे लोक रोज 2 ते 2.5 लीटर लघवी करतात, त्यांना किडनी स्टोनचा धोका कमी असतो. किडनी हेल्दी बनवणारं हे ड्रिंक तुम्ही सकाळी किंवा दुपारी पिऊ शकता.

पुदीना टाकलेलं लिंबू पाणी - एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदीन्याची पाने आणि साखर टाकून चांगलं मिश्रण तयार करा. हे ड्रिंक किडनीसाठी फारच फायदेशीर ठरू शकतं.

मसाला लिंबू सोडा - एक ग्लासात लिंबाचा रस, जीरं-धनिया पावडर, चाट मसाला आणि सोडा चांगल्याप्रकारे मिक्स करा. अशाप्रकारे तुम्ही किडनीला निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी ड्रिंक तयार करू शकता.

लिंबू-नारळाचं पाणी - किडनीसाठी हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळाचं पाणी टाका. त्यात लिंबाचा रसा मिक्स करा. याचं सेवन करून तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता.